⭕ *निकिता पाटील यांची जिल्हा सत्र न्यायालयात निवड...*🔘

 

  ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१८ डिसेंबर बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर चाकवे-सडावण (ता. अमळनेर) येथील रहिवासी निकिता राजू पाटील हिने  2023 च्या जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक परीक्षेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे. गुणवत्ता यादीत ती 59 वी आली आहे. शासनाने ही मेरिट लिस्ट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केली आहे.निकिता पाटील हिने माध्यमिक शिक्षण येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात तर उच्च महाविद्यालयीन शिक्षण येथील प्रताप महाविद्यालयात घेतले आहे. तिने प्रताप महाविद्यालयात गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन हे यश संपादन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर निकिता पाटील हिचा शिवशाही फाऊंडेशन तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील व शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे, पालक राजू पाटील, कनिष्का पाटील, दिव्या पाटील आदि उपस्थित होते. दरम्यान प्रताप महाविद्यालयांत खानदेश शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे यांनी निकिता पाटील या विद्यार्थिनीस गुणगौरव चिन्ह, प्रतापिय देऊन सत्कार केला. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे सह सचिव डॉ.धीरज वैष्णव, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील, डॉ.विजय बी मांटे,रुसा व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, गणित विभागाच्या प्रमुख डॉ.नलिनी पाटील, डॉ.जितेंद्र पाटील, गणित विभागातील डॉ.वंदना भामरे, प्रा.रोहन गायकवाड, प्रा.प्रेरणा सोनवणे, प्रा.प्रियंका पाटील, प्रा.शशिकांत जोशी, कुलसचिव राकेश निळे आदींनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.----चाकवे- सडावण (ता. अमळनेर) निकिता पाटील हिचा सत्कार करताना जगदीश पाटील, उमेश काटे व राजू पाटील

========================================

Post a Comment

0 Comments