⭕ *सी सी आय केंद्र सुरू करण्यासाठी शेतकरी यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांना दिले निवेदन...*🔘

   ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१६ डिसेंबर सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मोठी खास बातमी जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुक्यात अमळनेर अग्रणी तालुका असताना अमळनेर येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालू केले नाही हा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय सण करत आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात कापसाचे भाव सीसीआय भावापेक्षा ५०० ते १००० रुपयांनी कमी आहेत जिल्ह्यात  (११ )केंद्र चालू आहेत पण अंमळनेरला केंद्र अद्याप सुरू केलेले नाही शेतकरी यांनी विनंती  केली आहे उपविभागीय दंडाधिकारी विभाग अमळनेर यांना सी सी आय केंद्र सुरू करण्यासाठी काँग्रेसकडून शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी केंद्र सुरू करावे असे विनंती विभागीय दंडाधिकारी भाग अमळनेर व तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना सुभाष सुकलाल पाटील ,दिनेश अशोक पाटील ,दिनेश उत्तमराव पाटील, त्र्यंबक बिपिन पाटील ,विठ्ठल उत्तम पवार ,प्रताप जलाराम पाटील, भानुदास आनंदा पाटील ,अशोक अर्जुन पाटील, सुरेश किरण पाटील, शिवाजी जुलाल पाटील, शरद नथू पाटील ,रवींद्र झाब्रू पाटील, रामकृष्ण नामदेव पाटील, यांनी खाली सह्या केलेले आहेत

===================≈====================

Post a Comment

0 Comments