⭕ *सु.हि.मुंदडे हायस्कूल व श्री. द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय याचा संयुक्त विदमानाने ७६ व्या प्रजासत्ताक दिन साजरा ...विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट संचलन व कवायतीचे संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी यांनी कौतूक केले...*🔘



 (अमळनेर शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२७ जानेवारी रविवार :- जळगाव जिल्ह्यातील खास बातमी मारवड (अमळनेर)-  26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.त्याच प्रमाणे २६ जानेवारी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मारवड येथील सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ . साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयात ग्राम विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला तसेच मान्यवरांना पथसंचलनाद्वारे मानवंदना दिली. या कवायत व पथसंचलनासारख्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे संस्थेचे व शाळेचे नाव उंचावले आहे.

सदर ध्वजारोहणासाठी संस्थेचे उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सचिव देविदास पाटील, तसेच संस्थेचे पदाधिकारी व मारवड गावाचे महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, मारवड येथील  आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच गावातील विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व शाळेतील माजी प्राचार्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.  ध्वजारोहणानंतर वर्षभरात शाळेत विविध शालेय स्पर्धेद्वारे मिळवलेल्या यशाबद्दल तसेच इ.10 वी 12 या परीक्षामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना चॉकलेटस वाटप करण्यात आले.   

        कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पर्यवेक्षक संजय बागुल, एन. वाय. साळुंखे यांनी केले. शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट संचलन व कवायतीचे संस्थेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी यांनी कौतूक केले. येत्या 6 व 7 रोजी होणाऱ्या शालेय स्तरावरील घेण्यात येणाऱ्या आनंदमेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमही  (गॅदरीग) सर्वांनी मोठ्या उत्साहात व एकजुटीने घडवून आणावा व शाळेचे नाव उज्जवल करावे असे आवाहन सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी संस्थेचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी व पदसिध्द सदस्य यांनी यावेळी केले.

=========================================

Post a Comment

0 Comments