(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२९ मार्च शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात दररोज सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून सायबर गुन्हेगार इंटरनेट आणि संगणकप्रणालीचा वापर करून करोडो रुपयांवर रोज डल्ला मारत आहे.2023 आणि 2024 साली अनुक्रमे 20 लाख आणि 28 लाख प्रकरणे दाखल झालेली असून त्यामधून 3800 करोड आणि 4400 करोड रुपये सायबर गुन्हेगारांनी पळवले.सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जळगाव पोलीस आणि भावसार शेअर मार्केटचे संचालक कुणाल भावसार (B.E.,LL.B.) ह्यांच्या संयुक्तविद्यमानाने "सायबर साथी" हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे ट्रायल अमळनेर शहरात घेण्यात आले.
सदर जनजागृती अभियानाला अमळनेर शहरातील पोलीस उपअधीक्षक श्री.केदारजी बारबोले,पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,API पिंगळे,PSI शिरसाट,PSI बोरकर आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते."सायबर साथी" या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाच्या ट्रायल मध्ये सायबर गुन्हेगारी पासून स्वतःला कसे वाचवावे आणि लवकरात लवकर सायबर तक्रार NCCRP पोर्टल वर कशी करावी ह्याबाबत DySp.केदार बारबोले,PI दत्तात्रय निकम,कुणाल भावसार ह्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात करण्यात आले...
==========================================




