⭕ *मारवड महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला वर्गाचे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न...*🔘




(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२५ मार्च मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला या वर्गाचे विद्यार्थ्यांचा दि. 24 /03/ 2025 रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला,सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. व्ही. एस.देसले होते, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले, तर सूत्रसंचालन कु.नाजमीन पठाण या विद्यार्थिनी केले. याप्रसंगी प्राध्यापकांनी तसेच कु. कोमल पाटील,कु.नेहा भोई,कु. नाजबीन पठाण, कु. वैष्णवी महाजन, कु. पूनम भिल,या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विविध स्पर्धेचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा  फोटो भेट म्हणून देण्यात आले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते...

=========================================

Post a Comment

0 Comments