(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ एप्रिल मंगळवार :- वाशिम येथील स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशीम येथील बी.एस.डब्ल्यू व एम.एस.डब्ल्यू उत्तीर्ण विद्यार्थी यांचा दीक्षांत संभारंभ दिनांक 7/4/2025 रोजी सरनाईक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय साळवीकर तर प्रमुख पाहुणे सरस्वती समाजकार्य महाविद्यालय येथील प्राचार्य प्रा.डॉ. संदीप शिंदे व प्रा. डॉ. किशोर वाहने,प्रा.डॉ.संजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये बी एस डब्ल्यू व एम.एस.डब्ल्यू शाखेतून विद्यापीठामधून महाविद्यालयातील पाच विद्यार्थी हे मिरीट आले होते. यामध्ये BSW. मधून द्वितीय क्रमांक अभय काळे, तृतीय क्रमांक कल्याणी धाराशिवकर, तर MSW शाखेमधून विद्यापीठातून प्रथम मिरीट वैष्णवी हारके,द्वितीय पूजा राठोड,तृतीय वैष्णवी कुकडे त्यांना सन्मानचिन्ह व शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित डिग्री प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्त डिग्री वितरण करून सर्वांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थिनीला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल कु. आकांक्षा गायकवाड ला सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अविस्कार स्पर्धेत विद्यापीठ निवड झाल्याबद्दल शिवकन्या सरकटे व आकांक्षा गायकवाड यांचा सत्कार केला.याप्रसंगीविद्यापीठ युवा महोत्सवामध्ये सहभागी विद्यार्थी साक्षी गिरी,तेजश्री नेहुल,वैष्णवी पानझडे,वैष्णवी काळे,प्रियल सुर्वे, कृष्णा आटपळकर, करण विटकरे, संकेत गोटे, विकास गिरी, विशाल जाधव यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. गडचिरोली येथे निर्माण शिबिरामध्ये प्रतिनिधित्व केल्याबद्दल कु साक्षी गिरी व कु सुजता इंगोले यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट वाचक म्हणून राणी गायकवाड व शिवकन्या सरकटे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. प्रा. डॉ. संदीप शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की "शिक्षण" हे मानवतेचा उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.शिक्षण हे केवळ ज्ञान देत नाही, तर ते व्यक्तीला जागरूक, सक्षम, आणि आदर्श नागरिक बनवते. त्याचबरोबर, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी एक मजबूत पाया निर्माण करते . त्यामुळे शिक्षण हा "तिसरा डोळा" 'आध्यात्मिक जागरूकते'चे प्रतीक आहे, जो मानवी जीवनातील सत्य आणि न्याय शोधण्यासाठी मार्गदर्शित करीत शिक्षण हे मनुष्याच्या अंतःकरणाला जागृत करते. असे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या मनोगत आतून विद्यार्थ्यांना संबोधित केले.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आकांशा गायकवाड व शिवकन्या सरकटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदर्शन प्रा.पंढरी गोरे ( समन्व्यक विद्यार्थी विकास विभाग )यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रा.डॉ.वसंत राठोड, प्रा.डॉ.रवींद्र पवार, प्रा. डॉ. पंडित नरवाडे, प्रा.डॉ.गजानन हिवसे,प्रा. गजानन बारड, प्रा.डॉ. प्रसेनजीत चिखलीकर, प्रा. विजय वानखेडे,प्रा.डॉ.जयश्री देशमुख, प्रा. ,प्रा.डॉ मनिषा कीर्तने, प्रा.डॉ दिपाली देशमुख,प्रा.डॉ. जयश्री काळे, यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले होते...
=========================================


