(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ एप्रिल मंगळवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील सकाळी शाळेची घंटा वाजली आणि अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशान पर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात मुंदडा विद्यालय दहावीच्या सन १९९२ बॅचने तेहतीस वर्षांनंतर ‘पुन्हा एक दिवस शाळेचा’ अनुभवला.नाथुराम नारायदास मुंदडा विद्यालयातील या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. आपल्या सर्व गुरूवर्याचा सत्कार करून त्यांचे आशिर्वादही त्यांनी घेतले. सगळे विद्यार्थी शिक्षकांसह मिरवणुकीने शाळेत दाखल झाले. आपण कितीही मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही. सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत. तरीही ना.ना. मुंदडा विद्यालयाच्या १९९१-९२ च्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल तेहतीस वर्षांनी पुन्हा जागवल्या ‘गेट टुगेदर ' या उपक्रमाद्वारे. १९९२ च्या बॅच च्या काही मित्र- मैत्रिणींचा व्हॉट्स ॲप ग्रुप तयार केला. अनेक मित्र- मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ ची संकल्पना पुढे आली. दिवस ठरला रविवार, ६ एप्रिल. सकाळी साडेआठ वाजता .त्या दिवशी सकाळपासूनच शाळेचा आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते. सेल्फी काढत होते. सर्वांचा एक युनिफॉर्म ठरला होता. पांढरा कुर्ता व निळ्या रंगाची जीन्स, मिरवणुकीने सर्व जण शिक्षकां सोबत प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले. शाळेत असताना व्हायची तशी घंटा वाजली. सर्व जण एका रांगेत उभ राहिले. त्यानंतर प्रांगणात उपस्थित सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक वसंत अवचार यांनी सगळ्यांना एकत्र करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या वर्गात रांगेत जाऊन बसले. यावेळी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना अवचार यांनी पूर्वी प्रमाणे छडीचा मार देऊन शिक्षा केली. वर्गात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परिचय आपण सध्या करीत असलेल्या कामाचा आलेख सर्वांसमोर मांडला. त्याच बरोबर आपली मुलं काय करतायेत हेही सांगितले. त्यानंतर गुरुवारच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय सचिव आशीष मुंदडा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान मुख्याध्यापक दिनेश उंटवाल , श्रीकिसन shrikishan मानधने , माजी मुख्याध्यापक सारडा , निवृत्त मुख्याध्यापक गणपत चव्हाण , निवृत्त सहशिक्षक सुधाकर पखाले अरविंद देशमुख, वसंत अवचार, विद्यमान उपमुख्याध्यापक नेरकर मॅडम, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्या मधून विष्णु शर्मा व संतोष एन्नेवार हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व शिक्षका शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेतील दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक व संस्थेचे सचिव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपले भविष्य उज्वल करण्याचा आशीर्वाद दिला.विकास गवळी ,पंढरी देवळे व मीनाक्षी बिर्ला या विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या.तर प्रा.डॉ.रेखा आढाव यांनी आपल्या मनोगता मधून गेट-टुगेदर संकल्पनेमागे सार्थक प्रयोजन असण्या विषयीचा आग्रह धरला. आपले जीवन आनंदी होण्यासाठी आपल्याला कुटुंबाने, समाजाने , शाळेने आणि गावाने भरभरून दिले आहे आता आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आली आहे. या गेट-टुगेदर च्या माध्यमातून आपण मित्र-मैत्रिणींनी वृक्षारोपणा सारख्या महत्त्वपूर्ण कार्य करिता आपले योगदान दिले पाहिजे असे सांगितले. यावेळी अरविंद देशमुख यांनी रामनवमीच्या निमित्ताने रामा वरील एक गीत सादर करून सर्व वातावरण भक्तीमय . शिरीष लाहोटी यांनी लिहिलेली कविता व शेरोशायरी यावेळी सादर केली.यामध्य शिरीष लाहोटी,भारत नाकाडे ,सचिन अग्निहोत्री ,दिलीप गट्टानी ,विनोद चव्हाण ,पंडीत घुगे,अमोल पांडे ,मनोज काळबांडे ,नितीन अवचार,गजानन घुगे,विकास गवळी,संतोष बियाणी, विजय जाधव ,विठ्ठल भानुसे आणि मुली मधून रेखा अढाव (राऊत),रचना सारडा (कोठारी),वर्षा भादिकर (गेडाम),मिनाक्षी बिरला (मुंदडा),गीता मुंदडा (सुरजन) , अनुसूया पाठक(खोत) ,ज्योती नागापुरे (गोफणे) , रेखा उगले व इतर विद्यार्थी उत्साहात हजर होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विठ्ठल भानुसे व प्रा.डॉ.रेखा आढाव तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.विजय जाधव यांनी केले.दुपारी भोजनाचा आस्वाद घेतल्या विविध प्रकारच्या खेळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला गीता मुंदडा हिच्या आयोजनातून आपल्या शालेय जीवनातील एखादी वस्तू आणून दाखवावी व माझ्याकडून भेट घेऊन जावी असा जो संदेश दिला होता त्या संदेशातून शोभा गोठवाड या विद्यार्थिनीने तिच्या काळातील शाळेची पेटी शाळेतील छायाचित्र व इतर साहित्य आणून मित्र मंडळांच्या कडून बक्षीस घेतले. यानंतर गीता मुंदडा येणे 52 पत्ते व चिट्ठीच्या माध्यमातून एक खेळाचे आयोजन करून 12 बक्षिसाचे वितरण केले. तर मीनाक्षी बिर्ला हिनी सुद्धा चौकट खेळाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली. यानंतर विठ्ठल भानुसे यांनी कवितेच्या माध्यमातून 1992 च्या व त्या संबंधित आजच्या काही आठवणी जागृत केल्या. यावेळी उपस्थित काही विद्यार्थ्यांनी शेरोशायरी, चुटकुले व चारोळ्या च्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ.वर्षा गेडामने गित सादर केले. त्यानंतर मुलांची व मुलींची वेगवेगळी संगीत खुर्ची च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मुलांमधून विजय जाधव तर मुलींमधून चारुशीला वाटवाले हिने स्पर्धा जिंकली.सर्वांनी गाण्यावर ठेकाही धरला.या कार्यक्रमासाठी शिरीष लाहोटी प्रा.रेखा आढाव प्रा. विजय जाधव , नितीन आवचार, पंडित घुगे,मनोज काळपांडे, विनोद चव्हाण, संतोष बियानी ,भारत नाकाडे या साऱ्यांनी मेहनत घेतली . पुन्हा एकदा भेटायचे वचन एकमेकांना देत शाळेतचा तो एक अनोखा दिवस सरला होता...
========================================
