(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ एप्रिल सोमवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील आराध्य दैवत श्री ढवळेश्वर संस्थान,मालेगाव येथे आमली बारसच्या निमित्ताने आयोजित शिवपुराण कथा सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे यामध्ये दररोज सकाळी काकड आरती,श्रींची महाआरती,सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ५ शिवपुराण कथा,सायंकाळी हरिपाठ,तसेच रात्री ८ ते १०.३० या वेळेत कीर्तनाचे कार्यक्रम भक्तिभावाने पार पडत आहेत या सप्ताहामध्ये शहरातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भक्तीचा झरा अविरत वाहत ठेवला आहे.या पावन प्रसंगानिमित्त ९ एप्रिल २०२५ रोजी, बुधवारला सायंकाळी ४ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्री ढवळेश्वर भक्त मंडळ,मालेगाव यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे हार्दिक आवाहन करण्यात आले आहे ही अध्यात्मिक पर्वणी भाविकांच्या मनावर संस्कारांची अमिट छाप सोडत असून,श्रींच्या चरणी अर्पण करण्याची ही सुवर्णसंधी आहे...
=========================================
