(अकोला जिल्हा मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला / तेल्हारा ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२३ एप्रिल बुधवार :-अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील दिनांक 14 एप्रिल भीम जयंती निमित्त लावलेले निळ्या झेंड्याची विटंबना केली विटंबना करणाऱ्यांवर तेल्हारा पोलीस कारवाई न करता न्याय मागण्यासाठी गेलेल्या भीमसैनिकांवर विनाकारण गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावे करिता निवेदन देण्यात आले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ला जगभरात भीम जयंती साजरी होत असते जयंती साजरी होत असताना तेल्हारा तालुक्यातील दहिगाव या ठिकाणी गावातील काही षभीमसैनिकांनी गावाच्या प्रवेशद्वारावर निळा झेंडे व धम्म ध्वज लावले होते परंतु काही जातिवाद्यांना हे सहन झालं नाही त्यांनी या झेंड्याची विटंबना जाळून टाकण्याचे मुळुन टाकून विटंबना केली निळे झेंडे काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा नेण्यात आला होता तिथे गुन्हे दाखल केले.ज्यांनी झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु काही संघटनेने विनाकारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला यामुळे संपूर्ण तेल्हारा तालुका बंद करण्यात आला विनाकारण दोन समाजात दंगे भडकून वातावरण दूषित करायचे उद्देशाने हा प्रकार करण्यात आला.ज्यांनी झेंडे काढले त्यांच्यावर गुन्हे दाखल न होता न्याय मागण्यासाठी गेलेल्या 37 भीमसैनिकांवरच खोटे गुन्हे दाखल करून तरुणांची धरपकड सुरू केली आहे.ज्यांनी निळे झेंड्याची विटंबना केली त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही. जे नेमागे साठी गेले त्यांच्यावरच अन्याय या ठिकाणी झाला,हा अनुसूचित जाती जमातीवर अन्याय अत्याचार आहे पोलीस प्रशासनाने ज्यांनी विटंबना केली आमच्या भावना दुखावल्या समाजावर बहिष्कार टाकला त्यांच्यावर कठोर कारवाई करून ॲट्रॉसिटी अंतर्गत खालील प्रमाणे गुन्हे दाखल करा.जातीसंबंधी अपशब्द वापरणे.अधिनियम कलम ३(१)(s) गुन्हे दाखल करा.धार्मिक मानल्या जाणाऱ्या अथवा श्रद्धास्थान असलेल्या स्थळांना हानी पोहचविणे, महापुरुषांची विटंबना करणे.नष्ट करणे किंवा विटंबना करणे.अधिनियमांचे कलम ३(१) (t) मध्ये दाखल करा.अनुसूचित जाती जमातीवर सामाजिक व आर्थिक बहिष्कार टाकणे किंवा तशी धमकी देणे.(अधिनियमांचे कलम ३(१) (झेडसी)अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात खोटा पुरावा देणे किंवा खोटा पुरावा तयार करणे.खोट्या केसेस मध्ये फसवणे (अधिनियमांचे कलम ३(२) (i) आणि (ii))बळजबरीने घर,गांव किंवा रहिवास सोडण्यास विवश करणे,जबरदस्ती करणे.अधिनियमाचे कलम ३(१)(z) गुन्हा दाखल करणे.अनुसूचित जाती जमातीवर तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा अत्याचार चालू आहे.तात्काळ यावर निर्णय घेऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी करिता आम्ही निवेदन देत आहोत.!!
*आकाश दादा शिरसाट*
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
*🇪🇺.क्रांतिकारी जय भीम.🇪🇺*
=========================================

