⭕ *राष्ट्रीय मजदूर काँग्रेस ( इंटक) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी डी डी पाटील...*🔘




(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

           [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२२ एप्रिल मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस ( इंटक), संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक ) या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खा. डॉ.जी संजीवा रेड्डी साहेब यांच्या मान्यतेने पक्ष संघटनेतील उल्लेखनीय कार्य पाहता व कार्यक्षेत्रात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी डी डी पाटील  यांची जिल्हाध्यक्ष जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली.यापूर्वी नानासाहेबांनी जिल्हाध्यक्ष :ओबीसी सेल , महाराष्ट्र उपाध्यक्ष:अखिल भारतीय बिल्डिंग कंट्रक्शन फॉरेस्ट व वूड वर्कर्स असोसिएशन ,अध्यक्ष:महाराष्ट्र राज्य एस.टी कामगार काँग्रेस, जिल्हा संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जळगाव, अशी विविध पदे भूषविलेली आहेत.डी.डी पाटील यांची नियुक्ती झाल्याने काँग्रेस च्या सर्व सेल ने त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शांती निकेतन प्राथमिक विद्यामंदिर, आयटीआय व संस्थेच्या विविध युनिट मधील प्राचार्य/ मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

=========================================

Post a Comment

0 Comments