(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ एप्रिल रविवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मालेगाव तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकऱ्यांकडून संबंधित तलाठी यांनी अतीवृष्टीचे अनुदान देण्यासाठी दोनशे रुपये प्रमाणे शेतकऱ्यांकडून पैसे घेतले या तलाठी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व संबंधित शेतकरी यांना पैसे परत देण्यात यावे या संदर्भात तहसीलदार मालेगाव यांना तलाठी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रदिप पाटील मोरे यांनी केली आहे.
शिवसेना नेत्या आमदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनात व युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप पाटील मोरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी संबंधित तहसीलदार यांना फोन द्वारे तात्काळ संबंधित तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात येईल व संबंधित शेतकऱ्यांचे पैसे वापस करण्यात यावी अशा तहसीलदार यांना आमदार भावना गवळी यांनीही सूचना केल्या.यावेळी शिवसेना तालुका सचिव गजानन केंद्रे, शंकर खांबलकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व मसला खुर्द येथील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते...
========================================
