⭕ *आहिराणी भाषेच्या जागर व्हावा..या उद्देशाने आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात पुरस्काराने सन्मानित:.संभाजी देवरे...*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०४ एप्रिल शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दिनांक:३०, ३१ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दोन दिवशीय आयोजित आहिराणी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात केलेले कार्य कामगीरीचा मान ठेवुन  मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी संभाजीराव यांना "घर संसार" अहिराणी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता, तसेच लोक न्यूजचे संपादक संभाजी देवरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अमळनेरमध्ये आयोजित अहिराणी साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले सिनेमा क्षेत्रातील अद्वितीय योगदान स्वीकारताना मान्यवरांकडून सन्मानपत्र व पुरस्कार प्राप्त केले.

    संभाजी देवरे यांनी पत्रकारिता, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य महत्वाचे ठरले आहे, ज्यामुळे त्यांना या खास पुरस्काराने गौरवण्यात आले. अहिराणी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अविरत कामगिरीचा मान आणि कौतुक व्यक्त केले.अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी सांगितले की, "अमळनेरच्या साहित्य प्रेमींनी या संमेलनाला दिलेल्या प्रेमामुळे त्याची गोडी वाढली आहे." यावेळी त्यांनी या संमेलनाच्या यशस्वितेवर जोर देते सांगितले की, "या कार्यक्रमाने अमळनेरला सांस्कृतिक विद्यापीठ बनवले आहे."

     संमेलनात स्वागताध्यक्ष डी.डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे व के.डी. पाटील यांचे मनोगतही उत्साहवर्धक होते. मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील, सचिव प्रभाकर शेळके, डॉ. डिगंबर महाले, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, सौ. वसुंधरा लांडगे, प्रकाश महाले, गोकुळ बागुल, प्रकाश पाटील आणि रविंद्र पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते.संभाजी देवरे यांच्या कार्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या योगदानामुळे अहिराणी भाषेचा गौरव वाढला आहे आणि आगामी काळात नव्या सांस्कृतिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे...

=========================================



=========================================

=========================================


========================================
==========================================
========================================
========================================
==========================================
==========================================


Post a Comment

0 Comments