⭕ *श्री ढवळेश्वर संस्थान येथे २१ क्विंटल महाप्रसादाचे भव्य आयोजन यशस्वी...*🔘 ⭕ *हजारो भाविकांची उपस्थिती; भक्तिमय वातावरणात पार पडला महाप्रसादाचा सोहळा !..*🔘

 


(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१० एप्रिल गुरुवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मालेगाव  शहरातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री ढवळेश्वर संस्थान येथे दिनांक ९ एप्रिल २०२५,बुधवार रोजी शिवपुराण कथा सप्ताहानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने पार पडले या प्रसंगी सुमारे २१ क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत,संस्थान परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता या आध्यात्मिक सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते सकाळपासूनच भाविकांची उपस्थिती वाढत गेली महाप्रसाद वितरणासाठी आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. शिस्तबद्ध आणि सुस्थितीत पार पडलेला हा महाप्रसाद सोहळा भाविकांच्या मनात समाधानाची भावना निर्माण करणारा ठरला या संपूर्ण आयोजनाचे श्रेय श्री ढवळेश्वर संस्थान भक्त मंडळ,मालेगाव यांना जाते त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला भाविकांनी संस्थान मंडळाचे आभार मानत पुढील काळातही अशी परंपरा भक्तिपर्वणी अनुभवता यावी,अशी भावना व्यक्त केली अशा भक्तिभावाने भरलेल्या कार्यक्रमामुळे मालेगावकरांनी अध्यात्मिक समाधानाचा अनोखा अनुभव घेतला...

========================================

Post a Comment

0 Comments