(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०९ एप्रिल बुधवार :- वाशिम जिल्ह्याच्या महाली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कोंडाळा महाली येथील संघशक्ती तरुण मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेले आहे.यामध्ये प्रामुख्याने निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची नृत्य स्पर्धा चालता बोलता व तसेच 18 तास अभ्यास असे विविध कार्यक्रम असून यामध्ये काल दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत 18 तास अभ्यास हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये गावातील एकूण 27 मुलांनी सहभाग घेतला त्यामध्ये सर्व मुलांनी 18 तास अभ्यास करून महामानवाला मानवंदना देण्यात आली तसेच संघशक्ती तरुण मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये 18-18 तास अभ्यास करून आपल्याला समता स्वातंत्र्य व बंधुता या तत्त्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये 18-18 तास अभ्यास करून कशाप्रकारे आपले जीवन सुधारले याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असून सर्वत्र गावातून या उपक्रमाचे कौतुक केल्या जात आहे. असेच वेगवेगळे उपक्रम शक्ती तरुण मंडळाच्या वतीने करण्यात येतात असतात या वेळी संघ शक्ती तरूण मंडळ चे अध्यक्ष धम्मरतन आघम, उप अध्यक्ष सुरेश आघम, सह भीम जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष मिलिंद आघम, व नियोजक जीवन आघम यांनी विशेष परिश्रम घेतले...
=========================================

