(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०७ एप्रिल सोमवार :- वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील जालना येथील गिर्यारोहक विनोद हरिभाऊ सुरडकर यांचा संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नागपूर दिक्षा भूमी ते मुंबई चैत्यभूमी असा 1000 किलोमीटर चा प्रवास सायकल ने करीत असून आज सोमवार दिनांक 7 रोजी मालेगांव येथे पोहचले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.
स्थानिक वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे संतोष शेटे यांनी संविधान जागर अभियानावर विनोद सुरडकर हे आपल्या या सायकल प्रवासात प्रत्येक व्यक्ती कडे डिजिटल (पुस्तक आणि व्हीडिओ) स्वरूपात संविधान पोहचवणार आहे. घरोघरी संविधान पोहचवीत असून त्यासाठी विशेष असे क्यु आर बारकोड असलेले प्रचार पत्रक आणि जागोजागी स्टिकर लावणार आहेत.हा प्रवास त्यांनी दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी नागपूर येथून सुरुवात करून वर्धा - यवतमाळ - कारंजा -वाशिम -सिंदखेडराजा - जालना - संभाजीनगर मार्गे 14 एप्रिल 2025 रोजी दादर मुंबई येथे सपन्न होईल.दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी नागपूर दीक्षाभूमी येथून मोहिमेला सुरवात(फ्लॅग ऑफ) केली असून 14 एप्रिल ला चैत्यभूमी दादर मुंबई ला पोहचणार असून आज रोजी मालेगांव येथे पोहचले असता त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वत्सगुल्म जैव विविधता संवर्धन संस्थेचे संतोष शेटे, अनिल सरनाईक, समाधान काटेकर, वैभव काटेकर, सचिन चव्हाण, प्रमोद घोडके, सागर घोडके यांच्यातर्फे सत्कार करून मोहीमे करिता शुभेच्छा देण्यात दिल्यात...
==≈≈====================================
========================================
========================================
========================================
========================================














