(वाशिम जिल्हा मानद प्रतिनिधी:-अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०७ एप्रिल सोमवार :- वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आठवडा भर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.श्री प्रभु रामचंद्र जन्मोत्सव सोहळ्या निमित्त या सप्ताहचा प्रारंभ मिती चैत्र शु. 3 एप्रिल सोमवार रोजी
*श्रीमद् संगीत भागवत कथा प्रवक्ते*
ह भ प गजानन महाराज वाझुळकर शेलगांव ओंकारगीर यांनी व श्री गोविंदराव बाबराव घुगे यांच्या सौजन्याने तर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीत भागवत व अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला.गावातील सर्व भाविक भक्तांकरीता सर्व जाती धर्माच्या,पंथाच्या व राष्ट्र कल्याणार्थ सर्व जनतेची धर्मभावना जागृत व्हावी,समृध्दी अनावृष्टी व अकाली मृत्युपासुन येणारे अरिष्ट टळावे व सर्वांचे कल्याण व्हावे या सदिच्छेतून या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.दररोजची कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी 4 ते 6 काकडा भजन, विष्णु सहस्त्रनाम 6 ते 7 श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 7 ते 9 दुपारी 12 ते 5 हरिपाठ सायंकाळी 6 ते 7 व हरिकिर्तन रात्री 8 ते 11 अस हरिकिर्तन होते. पुजेचे मानकरी श्री राजु रुस्तुमराव घुगे व डिगंबर श्रीराम घुगे हे होते.श्रीमद् भागवत कथा व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली होती.तसेच ह भ प प्रल्हाद महाराज गिते हिवरखेडा यांचे काल्याचे किर्तन होते.कार्यक्रमाच्या शेवटी गावातील सर्व भाविक भक्ता करीता भव्य महाप्रसादाचे आयोजन सर्व गावकरी मंडळी मिळून केले होते. या वेळी श्रीराम घुगे,संजयराव घुगे,सुभाष मंत्री,भास्कर बहादुरे,गजानन कुटे, विनायकराव घुगे,मनोज घुगे,अभिजीत मेडशीकर,सचिन घुगे, राजू नागरे,दत्तराव घुगे,गजानन पिंपळकर, कैलास घुगे,संतोष शर्मा,संदिप घुगे, छबन घुगे,शिवम घुगे,अजिंक्य मेडशीकर,यांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले...
=========================================
========================================
========================================
==≈=====================================
========================================
========================================













