(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१६ जुन सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आदिवासींच्या समस्या अमळनेर विधानसभे चे विद्यमान आमदार अनिल दादा पाटील यांना आदिवासी शिष्टमंडळाकडून निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. तसेच पाडळसरे धरणाला केंद्रीय मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्यामुळे आदिवासी समाजाकडून आमदारांच्या विशेष सत्कार करण्यात आला होता.निवेदनात खालील प्रमाणे नमूद करण्यात आले होते,आम्ही अमळनेर तालुक्यातील सर्व आदिवासी तथा आदिवासी क्रांती दल शाखा अमळनेर च्या वतीने, अशी विनंती करतो की, आमच्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी सदर प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे, परंतु यावल प्रकल्प अमळनेर तालुका पासून 80 ते 85 किलोमीटर लांब असल्याने तसेच तसेच आदिवासी समाजाजवळ यावल येथे पोहोचणे खूप खर्चिक आहे, तसेच आदिवासी समाज हा हात मजुरी,शेत मजूर असल्यामुळे ज्यांना शक्य होत नाही, त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या विविध योजनांच्या आम्हाला लाभ मिळत नाही, अशा अनेक प्रकारच्या समस्या तालुक्यातील आदिवासींना असून, माननीय कार्यदक्ष आमदार अनिल दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की, आदिवासी प्रकल्प यावल यांचा आठवड्यातून एक दिवस अमळनेर येथे टेबल लावण्यात यावा, जेणेकरून विविध योजनांचा लाभ आदिवासींना घेता येईल, व आदिवासींच्या सर्वांगीण विकास साधता येईल, अशी विनंती आम्ही सर्व समाज बांधव आपणास करीत आहे, कृपया आमची विनंती आपण शासनापर्यंत पोहोचवून आम्हास न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली होती,त्यावेळी संघटने तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ बैसाणे, संतोष भाऊ संदानशिव, गोरख बाबा साळुंखे, मनोज पवार, अनिकेत ब्रम्हे, राजेंद्र चव्हाण, रामदास ढालवाले, प्रकाश भिल, धुलसिंग भिल, अर्जुन भिल, मनोज पारधी, भाईदास सोनवणे, बाळू पारधी, प्रकाश पारधी, रवींद्र पवार, रतिलाल पारधी, सुनील पारधी, ज्योतीबाई पारधी, जयश्री पारधी, मनीषा पारधी, रणूबाई पारधी, कु, निशा पारधी, पार्वती बाई पारधी, संगीताबाई पारधी इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते...
==========================================
