⭕ *शिवसेना सभासद नोंदणी अभियानास अमळनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..!.*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१९ जुन गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभासद नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार दादासो अमोल चिमणराव पाटील, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले.आजच्या दिवशी 201 नवीन सदस्यांची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली असून, ही संख्या पहिल्याच दिवशी मिळालेला उल्लेखनीय प्रतिसाद दर्शवते. याबद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील आणि शहर प्रमुख संजय कौतिक पाटील यांच्या हस्ते सभासद नोंदणीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.शिवसैनिकांनी निवडणुकांप्रमाणे सभासद नोंदणीसाठी देखील घराघरात जाऊन संपर्क साधावा, असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले.या कार्यक्रमात रविंद्र भाऊराव पाटील (हेडावे), माजी सरपंच अनील पाटील (रढावन), अमित ललवाणी (अमळनेर), संतोष महाजन, शिवदास पाटील, भूषण कोळी (हिंगीणे खु.), रितेश बोरसे, शोएब शेख, प्रकाश पाटील, रामकृष्ण पाटील, मानसिंग सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने युवक व शिवसैनिकांनी सहभाग घेतला.शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि पक्ष विस्तारासाठी हे अभियान महत्वपूर्ण ठरणार असून, आगामी काळात संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले....

==========================================

Post a Comment

0 Comments