(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१५ जुलै मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दिनांक १४ जुलै रोजी स्वतंत्र सेनानी अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर अॅण्ड पब्लिक लायब्ररी, तथा सुन्नी दारूल कजा अमळनेर यांच्या वतीने हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या सर्व पद अधिकारी यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हाजी शब्बीर अली सैय्यद यांना देण्यात आले होते.सुन्नी दारुल क़ज़ा व पब्लिक लाइब्रेरी आणि स्टडी सेंटर चे अध्यक्ष-मौलाना रियाज़ शेख यांनी प्रस्ताविक करताना म्हणाले हसनैन करीमैन वेलफेयर हे मुस्लिम समाजाचे अमळनेर येथे सामुहिक विवाह सम्पन्न करणारी ही पहली संस्था आहे,व सामाजिक बाधिंलकी जोपसणारी संस्था आहे (अमळनेर) 2017 पासुन ते 2024 पर्यंत यांनी गोर गरीब गरजु मुस्लिम 50 जोडप्यांचे काही न घेता लग्न लाउन दिले आणि त्यांच्या संसारात लागनारे भांडे (बर्तन) पलंग पिडी कपड़े गॅस कपाट ईत्यादि वस्तु भेट देउन त्यांना संसाराने लाउन दिले, आणि आता 2025 मध्ये अक्टूबर महीण्यात 11 सामुहिक विवाह करणार आहे,हे फार कौतुक स्पद आहे असे पुण्याचे सुंदर आणि छान कार्य ही संस्था करत आहे .
त्या नंतर राजू शेख यांनी हीं आपले मनोगते व्यक्त केले.यानंतर हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेचे सचिव- अजहर अली सैय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची सविस्तार माहिती दिली, संस्थेचे नवनियुक्त पदाधिकारी –
▪️ अध्यक्ष: मोना शेख
▪️ उपाध्यक्ष: सैय्यद नबी,व जुबेर पठाण
▪️ सचिव: अजहर अली
▪️ सहसचिव: अशफाक शेख
▪️ खजिनदार: आरिफ मेमन
▪️ सदस्य: शब्बीर पहलवान, जाकिर शेख पहलवान, जाकिर शेख यांचा सत्कार अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर अॅण्ड पब्लिक लायब्ररीचे अध्यक्ष रियाज मौलाना व त्यांच्या संचालक मंडळ तर्फे करण्यात आला. कार्यक्रमावेळी जळगांव येथुन आलेले सामाजिक कार्यकर्ते *अब्दुल लतीफ शेख* हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते , हाजी ताहेर शेख, कमरोदीन शेख, युसुफ पेंटर, अमजद अली शाह, नविद शेख, जाविद पेंटर, जमालुद्दीन शेख, सैय्यद अहमद अली, शकील शेख, युवा नेते सामाजिक कार्यकर्ता मनोज मोरे, मुश्ताक बागवान, फारुक खाटीक, सिकंदर पेंटर, मुन्ना बेलदार,आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन मसुद पठान कुरेशी व आभारप्रदर्शन हाजी ताहेर शेख, यांनी केले...
========================================





