(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ जुलै रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रति पंढरपूर अमळनेर आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी बघावयास मिळाली.आषाढी एकादशी निमित्त वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. त्यांचा भक्तिभाव जाणून विठुरायाचे रुप दिले होते. हे रुप डोळ्यात साठविण्यासाठी अमळनेर सह बाहेर गावाहून व तालुक्यांतील भाविकांनी प्रति पंढरपूर अमळनेर संत सखाराम महाराज दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. मंदिरातील दर्शन घेण्यासाठी गर्दी दिसून आली त्यामुळे मंदिर परिसरात नवचैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी परिसरातील वातावरणात उपवासाच्या पदार्थांचा आनंद लुटला. शिवाय काही भाविकांनी आषाढी एकादशीचा विठ्ठल रुक्माई चे दर्शन भाविकांची गर्दी दिसून पंढरपूर जाण्यासाठी भक्त न जाता अमळनेर येथे संत सखाराम महाराज विठ्ठल मंदिराचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले होते आषाढी एकादशी उपवास असल्याकारणामुळे दानशूर व सामाजिक कार्यकर्ते यांनी फराळाचे केळी खजूर राजगिऱ्याचे लाडू उपास निमित्त वाटण्यात आले होते...
=========================================


