⭕ *नगरसेवक पदाचा कालावधी संपल्यानंतर गायब न होता कार्यरत राहिल्याबद्दल.माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांचा सत्कार...*🔘



(परभणी शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

              [ लोकतक न्युज नेटवर्क ]

⭕ परभणी / परभणी ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ जुलै मंगळवार :- परभणी येथील खास बातमी परभणी.मा हे मे 2022 ला परभणी शहर महानगरपालिकेचे माजी सभापती तथा प्रभाग क्रमांक 13 चे माजी लोकप्रिय नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे  यांचा नगरसेवक पदाचा कार्यकाल संपल्यानंतर ते गायब न होता सक्रिय कार्यरत राहुल प्रभाग क्रमांक 13 च्या वसाहती मधील जनतेच्या आणि अडचणी प्रश्न समस्या सोडविण्यासाठी सातत्याने सतत करत राहून जनतेस सहकार्य करीत राहिल्याबद्दल त्यांचा मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील युवक कार्यकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक बालासाहेब गंगाराम झाडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून संभाव्य होणाऱ्या परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री मिळून देण्याकरता प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला या सत्कार उत्तर देताना विकास प्रभाकर लंगोटे मनाली की यापूर्वी मी ज्या पद्धतीने जनतेशी प्रामाणिक राहून इमानी इतबारे सक्रिय कार्यरत राहिलो त्याच पद्धतीने नव्या जोमाने आणि जिद्दीने भविष्यातही भारतीय संविधानाने निर्धारित केले ले मूलभूत हक्क सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोक राजे राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या आणि इतर बहुजन समाजाच्या उत्थामा करिता ज्या ज्या थोर महापुरुषांनी आपल्या सर्वस्वा चा त्याग करून सामाजिक बांधिलकी पत्करून कार्य केले त्याच पुरोगामी विचारांचा वारसा जतन करूनधर्मनिरपेक्ष व समाजवादी विचाराचा अंगीकार करून सर्व जाती-धर्माच्या तरुणांना व नागरिकांना सोबत घेऊन इमानी इतबारे कार्यरत राहील असे समाजासंगे गद्दारी करणार नाही व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कमी पडणार नाही तसेच शासनाच्या विविध लोक हित कल्याणकारी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना शासन दरबारी प्रयत्न करून मिळून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन या सत्काराच्या प्रसंगी जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे या भागातील कार्यकर्ते लक्ष्मीकांत रोडे मोहन कांबळे मारोतराव लोकरे गौतम झुंजारे गोपाळ बाळासाहेब झाडे आनंद कावळे गोविंद झाडे सतीश भालेराव बबलू खंदारे प्रेमचंद खरात अजय कुंपलवार राम चव्हाण हे व इतर बहुसंख्येने या परिसरातील युवक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते या सत्कार कार्यक्रमा चे प्रमुख अतिथी अजय राव पंडित किशोर रावसाहेब उबाळे प्रसाद हिरामण प्रधान अनिल राव झाडे अनिल कांबळे शेख फिरोज भाई प्लंबर सय्यद इरफान शेख शेरू भाई वर्कशॉप वाले आदींनी विकास भाऊ लंगोटे यांच्या कार्याचा गुणगौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

===========================================

Post a Comment

0 Comments