⭕ *शिरपूर येथे जागर कलामंच तर्फे शहीदे आझम भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न...*🔘

 


( धुळे/शिरपुर शहेर मानद प्रतिनिधी:नरेंद्र रायसिंग ) 

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ धुळे  / शिरपूर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२९ सोमवार:- धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील खास बातमी शिरपूर शहरातील खालचे गाव बौद्ध वाडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात जागर कलामंच तर्फे शहीदे आझम भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध , भारत देशाला अनमोल असे सुंदर भारतीय संविधान देणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शहिदे आझम भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.तसेच धम्माची आदर्श जीवनप्रणाली क्रांतीकारी विचारातून ग्रहण करून शहीदे आझम यांना 'ये भगतसिंग तु जिंदा है हर एक लहु के कतरे में' या क्रांतीगितातून शाहीर विजय अहिरे यांनी अभिवादन केले.

       ‌तसेच मेजर ते असिस्टंट सब इन्स्पेक्टर यापदापर्यंत नुकतीच पदोन्नती मिळवलेले जवान आयु.लोटन सजन खैरनार यांचा समाज बांधवांन कडून जाहीर सन्मान करण्यात आला. आणि सध्या ॲन्टी नक्षल ऑपरेशन ओरीसा येथे ते देशसेवेत कार्यरत आहेत. वंदनेच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत, १४ऑक्टोंबर रोजी  'धम्मचक्र प्रवर्तन दिनी' प्रबोधनपर व्याख्यानाचे नियोजन आजच्या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले.सदर या कार्यक्रमावेळी जमलेल्या समस्त समाज बांधवांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापुसाहेब इंदासे,प्रताप देवरे साहेब (SBI), दयानंद शिरसाठ साहेब,गौतम महिरे सर व लोटन खैरनार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी आर्थिक सहकार्य बरोबरच कार्यक्रम यशस्वीतेसाठीचे आवाहन केले. तसेच सामाजिक ऐक्य भावनेतून धम्मचक्र प्रवर्तन सोहळा यशस्वी करूया असे सुत्रसंचालन व आभार व्यक्त करताना ज्वाला मोरे सरांनी यावेळी सांगितले...

========================================

Post a Comment

0 Comments