(अमळनेर शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०३ शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील कुलस्वामिनी श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक:-06 ऑक्टोबर 2025 पासून ते दिनांक 8 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे.*स्थळ:- आर के नगरच्या मेन गेट मधून सरळ दक्षिणेस मातोश्री नगर धुळे रोड अमळनेर जि. जळगाव.*
*दिनांक:-06 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यक्रमाची रूपरेषा....*
*संत सखाराम महाराज वाडी पासून राजहोडी चौक, झामी चौक, वडचौक, शिरूड नाका, सुरभी कॉलनी, आमदार अनिल पाटील यांचे निवासस्थान पासून धुळे रोड तर थेट आर के नगर मधून मातोश्री नगर मंदिरापर्यंत मिरवणूक वाजत गाजत दुपारी 2:00 वाजेपासून निघणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी मिरवणुकीसाठी अवश्य यावे ही विनंती.*
★★★★★★★★★★★★★★★
*दिनांक ७ ऑक्टोबर 2025 रोजी कार्यक्रमाची रूपरेषा......*
*सकाळी 8:30 बडगुजर समाज बंधू भगिनी व सर्वांच्या समवेत श्री चामुंडा मातेची अखंड ज्योत ही श्री चामुंडा माता मंदिर पिळोदा येथून सकाळी 8:00 वाजता घेऊन आगमन व ज्योत दर्शन होणार आहे.*
*सकाळी 8:30 वाजता प्रधान संकल्प, गणपती पूजन,पुण्याहवाचन* *मातृकापूजन, आयुष्य मंत्र जप, नांदी श्राद्ध ,दिग्रक्षण, पंचगव्य कुंड पूजन, वास्तु मंडल,योगिनी मंडळ, क्षेत्रपाल मंडल,सर्वतोभद्र मंडल,नवग्रह- रुद्रादी मंडळ स्थापन*
*दुपारी 2:30 वाजता- देवता जलाधिवास,न्यास, मंदिर व देवता स्नपण, नवग्रह हवन शांती, पुष्टी, कुटीर,पराय हवन, शया तथा धान्याधीवास.*
*सायंकाळी पूजन नैवेद्य आरती व सांगता.*
★★★★★★★★★★★★★★
*दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यक्रमाची रूपरेषा......*
*सकाळी 8:00 वाजता- प्रांत पूजन हवन,स्थापित देवता हवन, उत्तरांग हवन*
*सकाळी 10 वाजता आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार भाषण*
*सकाळी 11 वाजता कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, बलिदान पूर्ण आहुती ,दान संकल्प आरती व महाप्रसाद*
*दुपारी 12:00 वाजता महाप्रसाद (भंडारा )*
★★★★★★★★★★★★★★★
*तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास अवश्य उपस्थिती देऊन या महापुण्यकर्मात सहभागी व्हावे ही विनंती चामुंडा माता मंदिर निर्माण समिती व पंच मंडळ कार्यकारणी करीत आहे...
=========================================




