⭕ *मारवड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...*🔘

( अमळनेर शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०३ शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री  यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी भूषविले. 

      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.वसंत देसले व उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.डी. पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

        सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून श्रमदान केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी प्रत्येकाने आपलं घर,आपला परिसर,आपले गाव स्वच्छ करण्याचा निर्धार करावा असा संदेश दिला.प्लास्टिक मुक्त अभियान, स्वच्छता अभियान राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  

     कार्यक्रमाचे  आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ . जितेंद्र माळी  यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, प्रा.विजय पाटील,प्रा.डॉ. दिलीप कदम, प्रा.डॉ. माधव वाघमारे, प्रा. डॉ.संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, डॉ. सचिन पाटील, श्रीमती मंजुषा गरूड, श्री. दिलीप चव्हाण, श्री. दिपक पाटील,श्री. अतुल साळुंखे, श्री. शाम पाटील व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते...

==========================================

Post a Comment

0 Comments