( अकोला/बाळापुर/जानोरी मोळ मानद प्रतिनिधी:देवराव भाऊ )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला/बाळापुर-जानोरी मोळ (लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी) दिनांक:२४ सोमवार :- अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील जानोरी मोळ द्वारा खास बातमी निंबा अंदुरा सर्कल मध्ये जवळपास 18 गावांचा समावेश होतो त्या गावांमध्ये निंबा फाट्यावरून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले निंबी हे गाव असून जवळपास या गावची लोकसंख्या 1500 ची जवळपास 2100 लोकसंख्या पर्यंत आहे तसेच स्वातंत्र्य काळापासून बळीरामजी शिरसकर यांच्या कारकिर्दीत त्या रस्त्याची थोडी झाली होती त्यानंतर या रस्त्याचे अजिबात काम झालेले नाही गावातील जनता ग्रामपंचायत प्रशासन व नागरिक या सर्वांनी मिळून बऱ्याच वेळा खासदार साहेब आमदार साहेब आणि जवळपास सर्व प्रशासनाच्या जवळ या दयनीय रस्त्याची अवस्था घेऊन सर्व व्यक्ती तिथं गेले व ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा गेले मात्र अद्याप पर्यंत गावाला रस्ता मंजूर झाला नाही व त्या रस्त्याविषयी कोणी कार्यततरता दाखविली नाही...
अडीच किलोमीटर चा रस्ता हा रस्ता स्वातंत्र्यापासून अशाच परिस्थितीत आहे तेव्हापासून भारिप बहुजन महासंघाची सत्ता बाळापुर तालुक्यावर असताना या रस्त्याचे एक किलोमीटरवर डाग दुजी झाली होती हा मार्ग अकोला ते जळगाव या रोडवर जोडल्या जाते आणि पुढे मुक्ताईनगर येथे हा मार्ग जोडल्या जाते मात्र आपल्या देशात आपले पंतप्रधान खूप मोठ्या ताकदीने सांगतात की असे एकही गाव नाही की जिथे रस्ता झालेला नाही मात्र अकोल्या जिल्ह्यातच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच विद्यमान खासदार धोत्रे साहेब हे सुद्धा 25 वर्षे झाले आपल्या जिल्ह्यावर ती विराजमान आहेत पण त्यांच्या निधीतून सुद्धा या रस्त्याकडे मंजुरी सुद्धा नाही आणि साधे लक्ष सुद्धा नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे तसेच या गावातील विद्यार्थी पावसाळ्यात जवळपास एक महिना घरीच असतात कारण रस्ता एवढा खराब आहे की त्या रस्त्याने जाता येत नाही तसेच या गावातील शेतकऱ्यांना शेतमालासाठी नेण्याला दुसऱ्या पर्यायी रस्ता नसून या गावातील नागरिक एवढे त्रस्त झाले आहेत...
की शेवटी त्यांनी हा पवित्रा एकमताने घेतला व सर्व आमचे एकमत करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवरती हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय या गावाने घेतलेला आहे तरी या गावाचा निर्णय एक निवेदन घेऊन गावातील जवळपास 25 ते 30 नागरिक अकोला पोलीस अधीक्षक अकोला जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद अकोला येथे त्यांनी आपले निवेदन पोचविलेले आहे तरी येणाऱ्या काळात निंबी या गावाने असा ठराव घेतला की येणाऱ्या निवडणुकीत आपण बहिष्कार टाकावा या ठरावावर सर्व गावकऱ्यांच्या एकमताने सह्या आहेत त्यामध्ये गौतम वानखडे विशाल वानखडे बाळू भिवटे पंकज भवटे विजय हागे भास्कर वानखडे अमोल कोकाटे उत्तमराव देशमुख विकास देशमुख इत्यादी नागरिकांच्या त्यावरती सह्या आहेत...
=================================================
.



